

दर महिन्याला महावितरणचे ‘ग्राहक समाधान शिबिर’
--
पुणे परिमंडळातील ५२ उपविभागीय कार्यालयांत आयोजन
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. पुणे परिमंडळातील ५२ उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
वीजबिलातील तक्रारी, वीजपुरवठ्याच्या समस्या, मीटर, नवीन वीजजोडणी तसेच महावितरणच्या विविध सेवांशी संबंधित तक्रारी ग्राहकांना या शिबिरात संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. त्यावर स्थानिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये असलेले गैरसमज आणि संभ्रम दूर करण्यासाठी शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती आणि त्याचे फायदे याबरोबरच महावितरणच्या विविध सेवा व योजनांची माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे. ग्राहकांनी संबंधित महावितरण उपविभागीय कार्यालयात आयोजित शिबिरात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.