
Mahavitaran
Sakal
पुणे : ‘महावितरण’च्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांच्या १५७ किलोवॉटपर्यंत वीजभारवाढीच्या ऑनलाइन अर्जांना ‘महावितरण’कडून आता स्वयंचलित पद्धतीने मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी कार्यालयात चकरा अथवा मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची गरज राहणार नाही. ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा ठिकाणी ग्राहकांनी शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांना केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर आणि कार्यान्वित होणार आहे.