Mahavitaran : महावितरणच्या कार्यालयांना आता ‘स्मार्ट मीटर’

पहिल्या टप्प्यात स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे.
electricity smart meter
electricity smart metersakal

पुणे - पहिल्या टप्प्यात स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात वीज ग्राहकांना वीजमीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली होती. त्यानुसार विविध शहरात स्मार्ट मीटर बसविण्यात आले. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.

महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल. तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्याबाबतीत चुकीचे रीडिंग होणे, वेळेवर रीडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात.

मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की, अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलांविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल, असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे.

वीजग्राहकांना मोफत ‘मीटर’

केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत, तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल-दुरुस्ती करण्याचे बंधन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com