पुणे - 'महाराष्ट्राच्या ७० वर्षांच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही, तेवढी बदनामी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली आहे. गाव, वाडी, वस्तीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे..दर 50 दिवसांनी एखादी विकेट जातेय, सरकारने नेमके काय चालवले आहे? अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी राज्य सरकारला धारेवर धरले.महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सुळे यांनी शनिवारी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके आदी उपस्थित होते..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते अस्वस्थ असल्याची कबुली दिली आहे, मात्र ते भाजप व त्यांच्या मित्र पक्षाच्या लोकांवर प्रचंड नाराज असल्याचे सुळे यांनी सांगितले. सुळे म्हणाल्या, "भाजप व त्यांच्या मित्र पक्षातील लोकांच्या वागणुकीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल, अशी परिस्थिती आहे.महाराष्ट्रातील विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळणे, बॅगेमध्ये रोकड सापडण्यापासून ते कंत्राटदाराच्या आत्महत्येपर्यंतचे प्रश्न आम्हाला इतर राज्यांचे खासदार विचारतात. महाराष्ट्रातील कुठल्याही घटनेची देशभर चर्चा होते, अशा घटना आमच्यासाठी अडचणीचे ठरतात. आम्ही सत्ताधाऱ्यांचे विरोधक असलो तरी, आमचे महाराष्ट्रावर प्रेम आहे. दररोज मंत्र्यांच्या विकेट जाण्याने आम्हाला आनंद होत नाही. त्यामुळे राज्याचेच मोठे नुकसान होत आहे.'.सुळे म्हणाल्या, 'सांगलीच्या ३५ वर्षीय कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतरही आपला त्याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगत सरकारने आपली संवेदनशीलता दाखवली आहे. राज्यात दररोज शेतकरी, शिक्षक, कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू आहेत. मग सरकारने दीडशे दिवसात काय काम केले? शिक्षकांच्या पगारासाठी सरकारकडे पैसे नसतील, तर ८० हजार कोटी रुपयांचे रस्ते कशासाठी व कोणासाठी?संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्या हत्या कोणी केली? त्यावेळी कोण पालकमंत्री होते? वाल्मीक कराडचा आका कोण होता? देशमुख व मुंडे यांच्यासारखी अनेक कुटुंबे उध्वस्त होत असताना क्लिनचीट कसली देत आहात. हत्येशी संबंध असणाऱ्यांना आम्ही निर्णय प्रक्रियेत येऊ देणार नाही.'.हिंजवडी प्रश्न तत्काळ सोडवावाहिंजवडीतील वाहतूक कोंडी व अन्य प्रश्नांबाबत मागील एक ते दीड वर्ष आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. आता तरी, राज्य सरकारने हिंजवडी प्रश्न तत्काळ सोडवावा. पायाभूत सोई-सुविधा होईपर्यंत कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दोन दिवस कार्यालय व उर्वरीत दिवस घरून काम करू द्या.शाळांच्या वेळांमध्ये बदल करावा. अतिक्रमणे काढण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली. तेथील कंपन्या, स्वयंसेवी संस्थांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असेही सुळे यांनी सांगितले..सुळे म्हणाल्या,- धनकड यांचा राजीनामा अस्वस्थ करणारा, उपराष्ट्रपतिपदाबाबत बोलणे योग्य नाही- वाल्मीक कराड व महादेव मुंडे खूनप्रकरणी अमित शहा यांची भेट घेणार- लाडकी बहीण योजना राबविणाऱ्यांना माधुरी मिसाळांच्या कामाची अडचण का?- लाडकी बहीण योजनेत पुरुषांचे अर्ज भरणाऱ्या एजन्सीची ईडी, सीबीआय चौकशी करा- नैतिकतेवर राजीनामा का नाही, राजीनाम्यासाठी दिल्लीची परवानगी कशासाठी हवी?- दौंड गोळीबारप्रकरणी मोक्का लावला जातो का पाहू?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.