

‘कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांवर महायुतीच्या १६० जागा येतील. सरकार म्हणून आम्ही महाराष्ट्रातील १३ कोटी लोकांसाठी काम करतो, त्याचा निश्चितच आम्हाला फायदा होईल,’’ असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
देशात परिवर्तन सुरू झाले आहे. संशोधन आणि शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. या प्रयत्नांसाठी जनतेच्या पाठबळाची अपेक्षा असते, ती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी पूर्ण केली पाहिजे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले, तर विकासाचा वेगही दुप्पट होईल, असेही ते म्हणाले.