
पिंपरी : मुघल सम्राट औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासमोर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी भीक मागितली होती. त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण काय करता? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यासारख्या प्रवृत्तींना सभागृहात आणि रस्त्यावर ठेचून काढले पाहिजे, असा संताप भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (ता. ४) विधिमंडळ सभागृहात व्यक्त केला.