'समृद्ध जीवन'च्या मोतेवारने दगडूशेठला अपर्ण केलेला सव्वा किलो सोन्याचा हार जप्त

Mahesh_Motewar
Mahesh_Motewar

पुणे : समृद्ध जीवन फुडस्‌च्या महेश मोतेवार याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जप्त केला. या सव्वा किलो सोन्याच्या हाराची किंमत 58 ते 60 लाख रुपये इतकी असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार 'सीआयडी'कडे सुपूर्द करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागामध्ये शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून समृध्द जीवन फुड्सच्या महेश मोतेवार याने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. त्यानुसार, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रासह अन्य राज्यातही गुन्हे दाखल झाले होते. सध्या महेश मोतेवार हे ओरिसा राज्यातील कारागृहात आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या 'सीआयडी'कडून केला जात आहे.

"सीआयडी'चे अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मोतेवार याने केलेल्या गुन्ह्याचा तपास 'सीआयडी'च्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. मोतेवारने गुंतवणूदारांना फसवणूक मिळवलेल्या पैशांची कोठे कोठे गुंतवणूक केली आहे, याचा तपास करण्यात येत आहे. त्याचा शोध सुरू असतानाच आम्हाला एक छायाचित्र सापडले, त्यामध्ये मोतेवार हा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींच्या मूर्तीस हार अर्पण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, हा हार जप्त करण्यात आला आहे. शेतकरी आणि इतर गुंतवणुकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून हा हार खरेदी केला गेला आहे.

यासंदर्भात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, "मोतेवार याने सप्टेंबर 2013 मध्ये श्रींना अर्पण केलेल्या संबंधीत सोन्याच्या हाराबाबत सीआयडी'ने आमच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी आपले मंडळ हे सार्वजनिक ट्रस्ट असल्याने आम्ही त्यांना धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडून पत्र आणल्यानंतर आम्ही सोमवारी त्यांच्याकडे 58 ते 60 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार सुपूर्द केला.''

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com