मारटकर खून प्रकरणाचा मास्टरमाईंड सापडला; पोलिसांनी कराडमध्ये केली अटक!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

महेंद्र सराफ आणि अश्‍विनी कांबळे यांच्या सांगण्यावरून सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागीर, अतुल भोसले, लखन ढावरे आणि इतर दोघांनी संगनमत करून मारटकर यांचा खून केला.

पुणे : युवा सेनेचे पदाधिकारी दीपक विजय मारटकर यांच्या खुनातील मुख्य आरोपीस गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मारटकर यांचा खून झाल्यापासून तो फरार होता. तो कुख्यात बापू नायर टोळीचा सदस्य असून सध्या नायरची टोळी तोच चालवत आहे.

राज्य सरकारनं माझ्यावर जबाबदारी सोपवावी : संभाजीराजे छत्रपती

महेंद्र सराफ आणि अश्‍विनी कांबळे यांच्या सांगण्यावरून सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागीर, अतुल भोसले, लखन ढावरे आणि इतर दोघांनी संगनमत करून मारटकर यांचा खून केला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मोडवे हा इस्लामपूर, सांगली, कराड या परिसरात असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली होती. पोलिस कर्मचारी अजय पवार आणि अमोल पवार यांना मिळालेल्या खबरीनुसार पोलिसांचे एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी तेथे गेले होते.
मोडवे कराड येथील पेठ नाका येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका कारमध्ये तो त्या ठिकाणी आला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. मोडवेवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!​

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलिस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, योगेश जगताप, सुधीर माने, बाबा चव्हाण, अशोक माने, अजय जाधव, महेश बामगुडे, विजयसिंह वसावे, गजानन सोनुने, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Main accused in murder case of Deepak Maratkar has been arrested by Crime branch