राज्य सरकारनं माझ्यावर जबाबदारी सोपवावी : संभाजीराजे छत्रपती 

टीम ई-सकाळ
Wednesday, 21 October 2020

मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. राज्याने माझ्यावर जबाबदारी सोपवावी, असं वक्तव्य आज, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. 

पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. याविषयावर आता राजकारण करण्याची वेळ नाही. केंद्राकडून मदत मिळवायची आहे. मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. राज्याने माझ्यावर जबाबदारी सोपवावी, असं वक्तव्य आज, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत आज केली. राज्याने केंद्राकडे आणि केंद्राने राज्याकडे बोट दाखवू नयेत. दोघांनीही समन्वयाने काम करण्याची ही वेळ आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.

आणखी वाचा - एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित

खासदार संभाजीराजे आज पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी मीडिशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यावर राजकारण करण्याची वेळ नाही. राज्याने पहिल्यांदा ओला दुष्काळ जाहीर करावा. राष्ट्रीय आपत्ती निवारणातून केंद्राची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. केंद्राची समिती येणं, त्यांच्याकडून मदत जाहीर होणं, या गोष्टी मी दिल्लीतून करून घेऊ शकतो. त्यासाठी राज्याने माझ्यावर जबाबदारी सोपवावी.' संभाजीराजे म्हणाले, 'मी हायवेवरून दौरा केला नाही, तर शेतात जाऊन शेतकऱ्यांचे दु:ख पाहिले. त्यांच्याशी बोललो. त्यामुळे शासनाने सगळी कामे बाजूला ठेवून हे काम करावे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhajiraje chhatrapati statement help from center for flood affected farmers