न्हावऱ्याच्या घटनेतील मुख्य आरोपी जेरबंद; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती 

भरत पचंगे
Monday, 9 November 2020

आरोपी विचित्र मानसिकतेचा असल्याने तपास खोलवर करणार असल्याची माहितीही पोलिस अधिक्षक देशमुख यांनी दिली.

शिक्रापूर : पाच दिवसांपूर्वी न्हावरा (ता. शिरूर) येथे एका महिलेच्या विनयभंग, झटापट, हल्ला व दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा करण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीस आज (ता. ९) चाकण चौकात जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आभिनव देशमुख यांनी दिली.

यंदाची दिवाळी पवार कुटुंबियांसाठी वेगळी; घेतला मोठा निर्णय​

याबाबत बोलताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, (ता. ३ रोजी) रात्री नऊच्या सुमारास न्हावरा येथील पिडीत महीला ही प्रात:विधीला गेली असता एका अनेाळखी व्यक्तीने छेडछाड करून या महिलेस जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये महिलेच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.

सदर गुन्हा दाखल होताच विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्परर पोलिस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, शिरुर पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे, शिक्रापूर, भिगवण, यवत, बारामती, दौंड, इंदापूर या विविध पोलिस स्टेशनची पथके तपासकामी दाखल झाली.

यादरम्यान, एकूण ७ पोलिस पथके तयार करून अथक प्रयत्नाने आज संायकाळी शिक्रापूर येथे चाकण चौकात ट्रकमधून प्रवास करून उतरत असताना आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हयाची कबूली दिल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

केंद्र सरकारमुळेच काश्मीरी तरुणांनी हाती शस्त्रे घेतली; मेहबुबा मुफ्तींची केंद्र सरकारवर टीका​

दरम्यान, न्हावऱ्यातील राजे काॅम्प्लेक्स परिसराचे समोरील बाजूस असणारे चायनिज सेंटरमध्ये काम करणाऱ्या वेटरने त्याचे दाढी व डोक्याचे केस काढलेले आहेत व त्याचे वर्णन गुन्हयातील पिडीतेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे जुळत असल्याचे सांगितल्यावरून आरोपीचा शोध सुरू केला आणि आज अखेर आरोपीस जेरबंद करण्यात आले. सदर जेरबंद आरोपी कुंडलिक साहेबराव बगाडे (वय ४७, मुळ रा. उंडवडी, ता. बारामती) येथील असून, तो स्वतःच्या पिशवीत शंकर पिंड व त्रिशूळ घेवून फिरतो तसेच विचित्र बोलत असल्याची माहिती डॉ देशमुख यांनी सांगितली.

Success Story : २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त केलं टॉप!​

खूप प्रयत्नानंतरही महिलेचे दोन्ही डोळे निकामी : घटनेनंतर पिडीत महिलेवर विशेष निरीक्षणाखाली पुण्यात ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. डोळयांच्यासाठी विशेष काळजीही घेण्यात आली, मात्र पिडीतेचे दोन्ही डोळे पूर्ण निकामी झाल्याची दुःखद वस्तुस्थिती डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The main accused in the shirur incident was arrested