Pirangut Accident
sakal
पिरंगुट - पुणे-कोला़ड महामार्गावर पिरंगुट (ता. मुळशी) येथील घाटात आज सकाळी दोन चार चाकी वाहने समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, घटनास्थळी बावधन वाहतूक पोलिस तातडीने दाखल झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.