पुणे : नवले पुलाजवळ विचित्र अपघात;15 गाड्या एकमेकांना धडकल्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

आंबेगाव हद्दीत असलेल्या नवले पुलाजवळ तब्बल 15 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. या विचित्र अपघातात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत असून अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.

पुणे : मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 10 दुचाकी व 8 चारचाकी वाहनांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4-5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरुन देहुरोडच्या दिशेने एक ट्रक भरधाव चालला होता. त्याचवेळी ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या 8 ते 10 दुचाकींना उडविले, तरीही ट्रक थांबला नाही, त्यापुढेही वेगात जाणाऱ्या ट्रकने 8 ते 9 चारचाकी वाहनांना ही उडविले.

पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!

अंगावर थरकाप उडविणाऱ्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. रस्त्याने जाणारे नागरिक आपला जीव वाचविण्यात धावू लागले, तर वाहनामधील नागरिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, तर किती जण जखमी झालेत, याची अद्याप मोजदाद झालेली नाही. या विचित्र व भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरीकांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरुन सोडला.

दरम्यान, घटना घडल्यानंतर काही मिनिटातच भारती विद्यापीठ पोलिस व वाहतूक शाखेचे पोलिस, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना मिळेल त्या वाहनामधून तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविले. त्याचबरोबर मृतदेह रुग्णवाहीकेतुन रुग्णालयात पोचविण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडुन अपघातातील मृत व्यक्ती व जखमी नागरीकांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच वाहतूक शाखेकडुन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत महामार्गवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मेट्रो खोदकामातील रसायनमिश्रित पाणी सोडलं कॅनॉलमध्ये; कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी कारवाईची मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major Accident At navale Bridge Pune