

Police probe underway after thieves looted 28 tolas of gold from a vacant house in Ambegaon taluka.
esakal
-नवनाथ भेके
निरगुडसर : माहेरी यात्रा असल्याने घराला कुलूप लावून घरातील बाहेर गेल्यानंतर ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला मारला असून ४० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील वळसेमळा येथील शीला सोनु वळसे यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ करत तब्बल २८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवार(ता.२१)रोजी रात्री उघडकीस आली आहे,या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.