पुरंदर तालुक्यात निसर्गाचा रौद्रावतार,  हातातोंडाशी आलेला घास हिरावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

valhe

पुरंदर तालुक्यातील वाल्हे व पिंगोरी परिसरात काल (ता. ८) सायंकाळी पाचनंतर अचानक भरून आलेले काळेकुट्ट ढग नेहमीप्रमाणे बरसून जातील, असे वाटत असतानाच त्याचे ढगफुटीत रूपांतर झाले.

पुरंदर तालुक्यात निसर्गाचा रौद्रावतार,  हातातोंडाशी आलेला घास हिरावला

वाल्हे  (पुणे) : पुरंदर तालुक्यातील वाल्हे व पिंगोरी परिसरात काल (ता. ८) सायंकाळी पाचनंतर अचानक भरून आलेले काळेकुट्ट ढग नेहमीप्रमाणे बरसून जातील, असे वाटत असतानाच त्याचे ढगफुटीत रूपांतर झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. अनेक एकरांवरील उभे पीक डोळ्यासमोर वाहून चाललेले दिसत होते, तर बहुतांश नाले व बंधारे नावापुरतेच उभे राहिले आहेत. शेती व वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आज दिवस उगवल्यानंतर नुकसानीचा अंदाज आला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


कडेपठारच्या दिशेने घोंघावत आलेल्या ढगांनी काल सायंकाळी रौद्र रूप धारण करत पिंगोरी व कांबळवाडीच्या डोंगरमाथ्यावर बरसायला सुरवात केली. कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वी पावसाने ढगफुटीचे रूप धारण केले. कालच्या या पावसाने रब्बी हंगामात हाताशी आलेली पिके, फळबागा, विहिरी, बंधारे, रस्ते 
यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओढ्यांवरील बंधारे बाजूने फुटून प्रचंड प्रमाणात पाण्याचे लोट प्रचंड वेगाने शेतांमध्ये व वस्त्यांमध्ये घुसल्याचे ग्रामस्थांनी 
सांगितले. या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्याची मागणी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केली आहे. या वेळी सरपंच अमोल खवले, दत्तात्रेय पवार, सूर्यकांत पवार, सतीश सूर्यवंशी, संभाजी पवार आदी उपस्थित होते. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार


पावसाळ्यापूर्वी ओढ्यावरील बंधाऱ्यांचे ढापे काढण्याचे काम पाटबंधारे विभागाने करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी वेळकाढूपणा केला. त्यामुळे प्रचंड वेगाने आलेले पाणी बंधाऱ्याचे भराव फोडून शेतांमध्ये, तर बापसाईवस्ती येथे पुराचे पाणी थेट वस्तीमध्ये घुसले. अचानक उभ्या ठाकलेल्या या संकटाने ग्रामस्थ घाबरून गेले. या पुरामुळे वाल्हे- पिंगोरी रस्ता वाहून गेला. अडाचीवाडीचाही पूल खचला. या दोन्ही गावांचा वाल्हे गावशी संपर्क तुटला. 

कारवाई करण्याची मागणी 
याबाबत गायकवाड मळा येथील नुकसानग्रस्त शेतकरी भाऊसाहेब भोसले, संतोष भुजबळ म्हणाले की, शासन दरवर्षी पाटबंधारे विभागाला बंधाऱ्यावरील ढापे बसविणे व काढण्यासाठी आर्थिक तरतूद करीत असते. मात्र, कालच्या घटनेनंतर शासनाच्या एवढा पैसा जातो कोठे, याबाबत संशय निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे आमचे मोठे नुकसान झाले. शासनाने या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. तसेच, नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.