esakal | आता लग्नाची सीडीही पोलीस ठाण्यात द्यावी लागणार; कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding

काही गावांमध्ये लग्न समारंभामुळे कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये 50 व्यक्तींची मर्यादा पाळण्यात येत नाही. काही लग्नसमारंभामध्ये 150-250 नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

आता लग्नाची सीडीही पोलीस ठाण्यात द्यावी लागणार; कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुमच्या घरात लग्न आहे... मग ते पन्नास लोकांच्या उपस्थित करा, पण ज्या पन्नास लोकांना तुम्ही लग्नाला बोलणार आहात, त्या सर्वांची नावे अगोदर पोलिस ठाण्यात द्या. एवढेच नव्हे तर लग्नाच्यावेळी प्रत्येकामध्ये सहा फूटाचे सामाजिक अंतर राखा. लग्नात मास्क काढून एकमेकांशी बोलू देऊ नका. कारण लग्न झाल्यानंतर त्याचे व्हिडीओ चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावयाची आहे. त्या सीडीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. 

एल्गार परिषद प्रकरण : गोरखे आणि गायचोर यांना 'एनआयए'नं घेतलं ताब्यात!​

ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीत करोना बाधित रुग्णांचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्यावर तात्काळ प्रतिबंध करणे आणि रुग्णालयीन व्यवस्थापन अधिक बळकट करुन कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू टाळण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपाययोजनांबाबतचे आदेश काढले आहेत. काही गावांमध्ये लग्न समारंभामुळे कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये 50 व्यक्तींची मर्यादा पाळण्यात येत नाही. काही लग्नसमारंभामध्ये 150-250 नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. 

कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...

या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनांबरोबर नियमावलीच ठरवून दिली आहे. यामध्ये लग्नसमारंभांमध्ये जेवण करताना सामाजिक अंतर राहील, अशा पद्धतीने खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना तसेच मास्क काढून एकमेकांशी गप्पा मारण्यावर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. सर्व नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. लग्नसमारंभासाठी विनावातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, खुले लॉन, सभागृह वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करणार असल्याचे हमीपत्र मंगल कार्यालय मालकांना द्यावे लागणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top