Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक
₹27 Lakh Drug Haul in Pune: अमली पदार्थ विरोधी पथक-एकमधील पोलिसांनी सापळा रचून भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजार रुपये किमतीची अफू आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Mephedrone, Opium Recovered in Massive Pune RaidSakal
पुणे : कोंढवा आणि बिबवेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत अफू आणि मेफेड्रोनसह २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत राजस्थान आणि बिबवेवाडीतील दोन संशयितांना शनिवारी अटक करण्यात आली.