

Drug Racket
ESakal
पुणे - लोणीकंद पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जचे रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी सलग पाच मोहीम राबवून सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ४२ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.