

Pune–Solapur National Highway to Get Safer with New Underpasses
Sakal
-प्रसाद कानडे
पुणे: पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने पुणे विभागाची हद्द असलेल्या भागात अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या सात ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) करण्यास सुरुवात केली आहे. सात पैकी तीन ठिकाणी मार्गाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित चार ठिकाणी काम प्रगतिपथावर आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, शिवाय वाहनचालकांच्या वेळेत व इंधनात बचत होणार आहे. यासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.