पिंपरी : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेचा महत्त्वपूर्ण टप्पा ‘पीएमआरडीए’ पूर्णत्वास नेत आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा दुमजली पुलावरून मेट्रोही जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण होईल..पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण केले आहे. हा उड्डाणपूल पुणे शहराच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाचा ठरेल. उड्डाणपुलावर मेट्रो मार्गासह तीन मार्गिका आहेत..विद्यापीठ चौक परिसरात सर्वाधिक वाहतूक कोंडी असते. या पुलामुळे औंध, बाणेर, पाषाण, गणेशखिंड रोड आणि सिम्बायोसिस चौक अशा परिसरातील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. तेथून विद्यापीठ चौकापर्यंतची सुलभ जोडणी देण्यात आली आहे. वर जाण्यासाठी तीन, तर खाली उतरण्यासाठी दोन मार्गिका असल्याने वाहतुकीवरील ताण कमी होईल. औंध ते शिवाजीनगर पर्यंतच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. बाणेरकडून पाषाणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे थोडे काम बाकी असून, ते वेगाने सुरू आहे..प्रकल्पाची वैशिष्ट्येउड्डाणपुलाची एकूण लांबी एक हजार ७६३.५२ मीटर१३३०.३२ मीटर मुख्य उड्डाणपूल वापरासाठी खुलाऔंध ते विद्यापीठ चौक जोडणाऱ्या तीन मार्गिका (लेन अप-रॅम्प)बाणेर आणि पाषाणकडे जाणारी थेट जोडणीमेट्रो ट्रॅकसोबत पुलाचे एकात्मिक नियोजन. जागेचा कार्यक्षम वापर.वाहतुकीच्या प्रवाहानुसार रॅम्पची रचना..औंध ते शिवाजीनगरपर्यंतचा उड्डाणपूल पूर्ण झाला आहे. बाणेरकडून पाषाणकडे जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी जागा उशिरा ताब्यात आली. त्यामुळे त्याचे काम बाकी असले तरी त्या कामाला गती देण्यात आली आहे.- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’.रॅम्पची माहिती(मीटरमध्ये)औंध ः २१०बाणेर : १५१पाषाण : ११६शिवाजीनगर : १७४.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.