
पुणे - तुमची सोसायटी जुनी झाली आहे. तिचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेकडे आराखडा दाखल करण्यासाठी जागेची मोजणी करायची आहे, तर काळजी करू नका. तुमच्याकडे जर जुनी मोजणीची प्रत असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ती सादर करा. त्यांनी तात्पुरते रेखांकन दिले, की ते घेऊन हद्द कायमची मोजणी करून घ्या. भविष्यात कोणतीही अडचण तुमच्या सोसायटीला येणार नाही.