संक्रांतीनिमित्त शुभेच्छांचे वाण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

 ‘‘काळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला... एकमेकींना वाण देण्यासाठी घरात होणारे हळदीकुंकवाचे कार्यक्रम... नववधूला हलव्याच्या दागिन्यांची भेट देत तिचे केलेले कौतुक अन्‌ ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ अशा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साही वातावरणाने मकरसंक्रांतीचा सण गोड झाला. 

पुणे - ‘‘काळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला... एकमेकींना वाण देण्यासाठी घरात होणारे हळदीकुंकवाचे कार्यक्रम... नववधूला हलव्याच्या दागिन्यांची भेट देत तिचे केलेले कौतुक अन्‌ ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ अशा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साही वातावरणाने मकरसंक्रांतीचा सण गोड झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूर्याचे दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमण होत असताना पौष महिन्यात पंचमीला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत असे तीन दिवस हा सण असतो. कुलदैवतांना तिळगुळाचा व गुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. दक्षिणेत याच दिवशी ‘पोंगल’ साजरा केला जातो.

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या दत्त मंदिरात खास हलव्याच्या दागिन्यांची आरास केली होती. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यासह अनेक मंदिरांमध्ये सुवासनींनी जाऊन ऊस, हरबरे, बोरं, तीळ, गव्हाची ओंबी देवाला अर्पण केली. तसेच, मकरसंक्रांतीनिमित्त विडा, सुगडे यांचे वाण महिलांना दिले. सायंकाळनंतर महिलांची हळदीकुंकवाची गडबड घरोघरी सुरू होती. यासह चुरमुरे, बोरं, तिळवड्या, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा यासह चॉकलेट, छोटी बिस्किटे यांचे मिश्रण लहान मुलांच्या डोक्‍यावरून टाकून बोरन्हाण करण्यात आले. 

सोशल मीडियावरही तिळगूळ घ्या, गोड गोड बोला
पुण्यात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सामाजिक व राजकीय व्यक्तींनाही जनसंपर्कासाठी मकरसंक्रांत महत्त्वाचा सण असतो. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्विटर, हॅलो या सोशल मीडियावरही ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला..’ यासह अनेक शुभसंदेश व्हायरल झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: makar sankranti celebration