Pune News : पालखी मार्ग खड्डे मुक्त, स्वच्छ करा

यावेळी रस्त्यावरील बेवारस गाड्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
Pune News
Pune Newsesakal

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केली. रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण कारवाई करून रस्ते मोकळे करणे, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, सुरळीत पाणीपुरवठा, शहरातील स्वच्छता याचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यावरील बेवारस गाड्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Pune News
Nashik News : जलसंपदाचा पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात ३० जून रोजी होत असून, त्यानिमित्ताने आयुक्तांनी पाहणी केली. अतिरिक्त पृथ्वीराज बी.पी ,घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, उपायुक्त जयंत भोसेकर, अविनाश संकपाळ यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयात व विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Pune News
Chhatrapati Sambhajinagar News : अखेर ३०० होर्डिंग्जचे; आले ऑडिट अहवाल

वारकरी पुण्यात आल्यापासून ते पुण्यातून बाहेर जाईपर्यंत त्यांना महापालिकेच्या कोणत्याही सुविधा कमी पडू नयेत. शहरात स्वच्छतेचे काम वारंवार करा, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर भर द्या, पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, वारकऱ्यांना चालताना रस्त्यात अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्या, खड्डे बुजवा असे आदेश आयुक्तांनी दिले.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेचे नियोजन

-येरवडा-कळस-धानोरी, औंध - बाणेर, भवानी पेठ, क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणार

- पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी आराम कक्ष

- या कक्षांमध्ये पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिटची व्यवस्था

- वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी फिरते दवाखाने

- शहरात विविध ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था

- पथ विभागाने पदपथ व रस्ते यांची डागडुजी करणार

- रस्त्यालगतच्या सीमाभिंत रंगविण्यात येणार आहे.

- पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी

- पाणीपुरवठा विभागाकडून पालखी मार्ग, मुक्कामाचे ठिकाणाच्या भागात २४ तास पाणीपुरवठा

- मनपाच्या शाळांमध्ये दिंड्या मुक्कामी असतात पाणीपुरवठा व तसेच पुरेशी शौचालये उपलब्ध करणार

- पालखी मार्ग, शाळांमध्ये औषध फवारणी व धूर फवारणी करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com