पुणे बनावे पुन्हा सायकलींचे शहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Cycyle City

सायकलचा वापर वाढवावा या हेतूने पुणे शहरात पेडल वाला ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपच्यावतीने शहराच्या विविध भागात सायकल फे-यांचे अनेक उपक्रम आयोजित केले जातात.

पुणे बनावे पुन्हा सायकलींचे शहर

कोथरुड - सलग एक किलोमिटर वीना अडथळा, सरळ व सुव्यस्थित असलेला सायकल मार्ग (Cycle Route) कोठे असेल तर आम्हाला दाखवा. थिगळे जोडावीत तसे जोडलेले, पथारीवाले व दुचाकीस्वारांनी अतिक्रमण (Encroachment) केलेले सायकल मार्ग आम्हाला नको. पुणे जर पुन्हा साकलींचे शहर (Cycle City) बनावे असे वाटत असेल तर सायकल मार्ग देखिल स्मार्ट हवा अशा भावना सायकल प्रेमींनी व्यक्त केल्या.

सायकलचा वापर वाढवावा या हेतूने पुणे शहरात पेडल वाला ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपच्या वतीने शहराच्या विविध भागात सायकल फे-यांचे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. कोथरुड मधील ठाकरे मार्गावर अशाच एका उपक्रमाच्या निमित्ताने आलेल्या ग्रुपमधील काही सदस्यांशी संवाद साधला असता आपल्याकडे एक सुध्दा व्यवस्थित सायकल मार्ग नाही अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली. नव्या वर्षाचा प्रारंभी अर्थातच गुढी पाडव्याच्या निमित्ताने नव्याने काही चांगले घडवू या असा संकल्प पेडल वाला समूहाच्यावतीने यावेळी करण्यात आला.

संतोष गोरडे म्हणाले की, मी गेली दहा वर्षे सायकल चालवतो. मला आपल्या पुण्याकडून, आपल्या पुणेकरांकडून सुस्थितीतील सायकल मार्ग हवा आहे. सायकल स्वाराला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. आम्ही हेल्मेटे, लाईट, सिग्नल इ. वाहतुकीचे सर्व नियम पाळून सायकल चालवतो.

पेडल वाला ग्रुपचे सारंग भीडे म्हणाले की, पेडल वाला समूहाच्या पेडलवाला समुहाव्दारे आम्ही विकली सायकलींग, हेरीटेज सायकलींग असे विविध उपक्रम राबवतो. सायकल मार्गाचा प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग येथे अडथळे आहेत. लोकांनी सायकल चालवावी असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर या मार्गावरील अडथळे दूर केलेच पाहिजे. तज्ञांनी त्यादृष्टीने उपाय योजना कराव्यात.

वेदिका गाऊडसे (विद्यार्थीनी) - वाट्टेल तेथे चार छोटे अरुंद खांब लावून सायकल स्वाराला स्टंट करण्यास भाग पाडणारे वा खाली उतरुन सायकलला धरत चालायला लावणा-या सायकल मार्गातून आमची सुटका करा. आम्हाला सलग, वीना अडथळा सायकल चालवता येईल असे मार्ग हवे आहेत. आत्ताच्या सायकलमार्गात खुप सुधारणा गरजेची आहे.

मैथीली पाटील (विद्यार्थीनी) - सरकारने कागदोपत्री सायकल मार्ग केले आहेत. त्याचा दर्जा व्यवस्थित नाही. त्यामुळे सायकल मार्गाचा उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा वापर करता येत नाही. आम्हाला सायकल चालवण्यासाठी रस्त्याचाच वापर करावा लागतो.

Web Title: Make Pune City Of Bicycles Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneBicycle
go to top