मलकापूर फटकरे चित्र स्पर्धा निकाल

मलकापूर फटकरे चित्र स्पर्धा निकाल

Published on

मलकापुरात फटकरे चित्र स्पर्धा उत्साहात

मलकापूर, ता. ३१ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त शिवसेना शास्त्रीनगर शाखा व शहीद भगतसिंग मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘फटकारे २०२६’ ही चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली.
यामध्ये स्पर्श वेदपाठक, शौर्य जाधव, आराध्या अंबिके यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा प्रारंभ नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांच्या हस्ते झाला. स्पर्धकांना रंगसाहित्य, कागद व खाऊवाटप करण्यात आले. रेखाटलेली चित्रे दर्शकांचे लक्ष वेधून घेत होती, फटकारे हा ग्रंथ प्रेक्षकांच्या अवलोकनाकरिता ठेवण्यात आला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांचा नितीन काशीद, अनिता जाधव, दिलीप यादव, अजित पुरोहित, शशिराज करपे, संजय चव्हाण, विद्यानंद पाटील, मधुकर शेलार, नीलेश सुर्वे आदींच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन सत्कार झाला.
गणेश खवळे, रियाज शिकलगार, नितीन शिंदे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम केले. विशाल गंधे यांनी सूत्रसंचालन केले.

---------------------------------

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
मोठा गट : प्रथम क्रमांक स्पर्श वेदपाठक, द्वितीय प्रचिती काटरे, तृतीय रुद्र मुंढेकर, उत्तेजनार्थ विहनराज पवार, सानवी साळवे, विशेष उत्तेजनार्थ मृण्मयी तोडकर, जागृती भोसले.
मध्यम गट : प्रथम शौर्य जाधव, द्वितीय अनन्या काटकर, तृतीय आरूष गायकवाड, उत्तेजनार्थ श्लोक माळी व विभा यादव, विशेष उत्तेजनार्थ सुमीत धनवे, प्रीतिदेवी प्रजापती.
लहान गट : प्रथम आराध्या अंबिके,
द्वितीय माही खंडेलवाल, तृतीय केतकी पडळकर, उत्तेजनार्थ सकिना मुतवल्ली, सानवी नरेगल, विशेष उत्तेजनार्थ अद्विका चाळके, वैष्णवी चव्हाण.

----------------------------
01239
मलकापूर : विजेता स्पर्धकांना गौरविताना नितीन काशीद, अनिता जाधव, दिलीप यादव, अजित पुरोहित, शशिराज करपे व शिवसैनिक.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com