मांजरी - मलेशियातील मलाका येथे झालेल्या मलेशिया चॅम्पियनशिप कार रॅलीमध्ये येथील निकिता टकले-खडसरेने भारताचे प्रतिनिधित्व करीत प्रथम पारितोषिक पटकावले. निकिताने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे मिळविलेली आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणातच चॅम्पियनशिप मिळवणारी ती पहिली युवती ठरली.