
माळेगाव : सर्वाधिक ऊस दर देणे, साखर कारखान्याची अर्थिक स्थिती मजबूत ठेवून कार्यस्थळाचा विकास करणे व एकरी उसाचे उत्पन्न वाढणे, असे कामकाजाचे सूत्र माळेगावचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याला स्वीकारले आहे. शुक्रवार (ता. १५) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माळेगाव कारखाना उसाच्या बाबतीत गेटकेनमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचे ठरले. त्यासाठी संचालक नितीन सातव यांच्या सोळा जणांच्या कमिटीने कार्य़क्षेत्रात १० टनापर्यंत ऊसाचे उत्पादन वाढविण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती माळेगावच्या उपाध्यक्षा सौ. संगिता कोकरे यांनी दिली.