

Malegaon witnesses heavy cross voting amid NCP factions, high turnout and intense political rivalry.
Sakal
माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुक अनुषंगाने आज मतदानाच्या दिवशी नगराध्यक्षपदासह १८ नव्या उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत टाकताना माळेगावकरांचा उत्साह चांगला दिसून आला. चुरसीच्या वातावरणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २२ केंद्रांवर सकाळी ९ नंतर गर्दी केली. साडेचार वाजेपर्यंत जवळपास ७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. या प्राप्त स्थितीमुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्जला सोरटे, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.