Baramati News : माळेगावात वादग्रस्त रस्त्याने घेतला मोकळा श्वास; माळेगावकरांनी केले प्रशासनाचे अभिनंदन

आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने तहसीलदारांच्या आदेशान्वये ६४१ गटामधील रस्त्यावरील तारेचे कुंपन जीसीबीच्या सहाय्याने काढून बाजूला फेकले.
आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने तहसीलदारांच्या आदेशान्वये ६४१ गटामधील रस्त्यावरील तारेचे कुंपन जीसीबीच्या सहाय्याने काढून बाजूला फेकले.
आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने तहसीलदारांच्या आदेशान्वये ६४१ गटामधील रस्त्यावरील तारेचे कुंपन जीसीबीच्या सहाय्याने काढून बाजूला फेकले.SAkal

माळेगाव : माळेगाव नगरपंचायत प्रशासन, महसूल विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात माळेगाव (ता. बारामती) इंजिनिअरिंग काॅलेज लगतचा वादग्रस्त व बंद रस्ता आज सार्वजनिक वाहतूकीसाठी खुला केला. सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आज इंजिनिअरिंग काॅलेज लगतच्या वादग्रस्त मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

परिणामी माळेगावकरांनी तहसिलदारांसह नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी भांगे आदी सरकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. दुसरीकडे, प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करीत आक्षेप असलेल्या बनसोडे कुटुंबियांनी यावेळी बोंबाबोंब आंदोलन केले. परंतु आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने तहसीलदारांच्या आदेशान्वये ६४१ गटामधील रस्त्यावरील तारेचे कुंपन जीसीबीच्या सहाय्याने काढून बाजूला फेकले.

माळेगावात इंजिनिअरिंग काॅलेज लगतचा वादग्रस्त ठरलेला रस्ता खुला करण्याबाबत प्रशासनाने आज (गुरुवारी) निर्णयक भूमिका घेतली. सकाळपासूनच माळेगावात महिला कर्मचाऱ्यांसह चाळीस पोलिस, चार पोलिस अधिकारी आणि नगरपंचायतीच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज होता.

यावेळी गैरसोय झालेल्या रहिवाशांही प्रशासनाला सहकार्य़ करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये रहिवाशी संतोष तावरे, निशीगंध विलास तावरे, रविराज तावरे, अमित तावरे, शशिकांत शानबाग, शशांक जमदाडे, भुजंग जाधव, महादेव वाबळे आदींनी प्रशासनापुढे आपली भूमिका मांडली.

मुख्याधिकारी बालाजी लोंढे म्हणाले,`` महसूल विभाग आणि माळेगाव नगरपंचायत प्रशासनाने संयुक्तरित्या पोलिस यंत्रणेच्या मदतीने गट क्रमांक ६४१ मधील बंद रस्ता सार्वजनिक वाहतूकीसाठी खुला केला. हा रस्ता १०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.

या रस्त्याच्या जागेचा मालकी हक्क सांगत बनसोडे कुटुंबियांनी रस्त्याची वहिवाट अनेक दिवसांपासून तारेच्या कुंपनाच्या आधारे बंद केली होती. परिणामी अनेक स्थानिक रहिवाशांची गैससोय झाली होती.``

सहाय्यक पोलिस निरिक्षक बालाजी भांगे यांनी माळेगावातील सार्वजनिक रस्ता खुला करण्याबाबत तहसिलदारांच्या आदेशाचा दोन्ही बाजूनी मान राखल्याचे सांगितले. आपेक्षकर्ते अरविंद बनसोडे म्हणाले,`` ही कारवाई बेकायदेशिर झाली आहे. आम्ही न्यायालयीन लढाई यापुढेही लढणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही सनदशिर मार्गाने काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला.``

आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी...

बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे यांच्याकडे माळेगावच्या रहिवाशांनी याआगोदर दाद मागितली होती. त्यानुसार पुर्वीचे न्यायालयीन आदेश, दोन्ही बाजूचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे, पंचनामा व पुरव्याच्या आधारे तहसीलदार शिंदे यांनी सदरचा रस्ता खुला करावा, असा आदेश ९ मे २०२४ रोजी स्थानिक प्रशासनाला दिला होता. त्या आदेशाची तंतोतंत अंमलबाजावणी स्थानिक प्रशासनाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com