माळेगावात आरक्षण फेरसोडतीने अनेकांच्या आशा पल्लवीत, तर काही नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात आरक्षण फेरसोडतीने अनेकांच्या आशा पल्लवीत, तर काही नाराज

माळेगावात आरक्षण फेरसोडतीने अनेकांच्या आशा पल्लवीत, तर काही नाराज

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : नव्याने अस्तित्वात आलेल्या माळेगाव (ता.बारामती) नगरपंचायतीच्या पंचवर्षिक निवडणूकीच्या निमित्ताने आज अनुसुचित जातीचे २  प्रभाग वगळता १५ प्रभागातील सुधारीत आरक्षण सोडत पार पडली. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांची पुर्णतः राजकिय समिकरणे बदल्याचे स्पष्ट झाले. मागील आरक्षणात फेरबदल झाल्याने काहींनी नाराजीपोटी सभागृह सोडून जाणे पसंत केले, तर काहींच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्याने त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करीत आनंद व्यक्त केला. त्याचवेळी निवडणुक आयोगाने ठरवून दिलेल्या सुचनेनुसार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी अनुसुचीत जातीच्या २ जागा वगळता उर्वरित प्रभागातील आरक्षण सोडत प्रक्रिया पुर्णत्वाला आणली.

हेही वाचा: Delhi Pollution: बंद करता येऊ शकणाऱ्या उद्योगांची यादी काढा: सुप्रीम कोर्ट

माळेगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१ च्या तयारीच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाबरोबर इच्छुक नगरसेवकांनी चांगली कंबर कसल्याचे दिसून येते. प्रांताधिकारी श्री. कांबळे, मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या अधिपत्याखाली शुक्रवार (ता. १२) रोजी १७ प्रभागामधील आरक्षण सोडत व प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला होता. परंतु आरक्षणातील तांत्रिक बाबींची मर्य़ादा सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आज (सोमवारी) प्रांताधिकारी श्री. कांबळे यांनी अनुसुचित जातीचे २ प्रभाग वगळता १५ प्रभागातील सुधारीत आरक्षण सोडत पुर्ण केली. सहाजित या नविन सोडतीच्या प्राप्त स्थितीमुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये ओबीसी महिलेचे आरक्षण बदलत त्या जागी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निघाले. तसेच प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वसाधारण महिलेच्या जागी ओबीसी पुरूषाला ती जागा गेली. प्रभाग क्रमांक ९ मध्ये ओबीसी पुरूषाऐवजी नविन सोडतीमध्ये सर्वसाधारण (ओपन) आरक्षण पडले. प्रभाग क्रमांक १३ मध्येही तशीच स्थिती झाली असून ओबीसी महिलेच्या ठिकाणी आता सर्वसाधारण (ओपन) महिलेसाठी जागा उपलब्ध झाली. प्रभाग क्रमांक १६ मध्येही ओपनच्या जागी ओबीसी महिलेला निवडणूकीला उभे राहण्याची संधी उपलब्ध झाली. या प्रक्रियेत अनुसुचित जातीसाठी मात्र प्रभाग क्रमांक ६ व ७ राखीव असल्याचे याआगोदरच स्पष्ट झाले होते.

हेही वाचा: IPL मध्ये सुस्तावलेल्या वाघाची T20 World Cup मध्ये डरकाळी!

नव्याने जाहिर झालेली प्रभागनिहाय आरक्षण सोडत, कंसात प्रभागाचे नाव पुढील प्रमाणे : प्रभाग क्रमांक १ (नागेश्वरनगर) : सर्वसाधारण महिला, प्रभाग २ (विद्यानगर) : सर्वसाधारण (ओपन), प्रभाग ३ (अमरसिंग काॅलनी) : सर्वसाधारण, प्रभाग ४ (दत्त चौक -पालखीमार्ग) : सर्वसाधारण, प्रभाग ५ (एसएसएम हायस्कूल ते प्राथमिक आरोग्य केंद्र ) : सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ ( बौद्धनगर-लकडेनगर) : अनुसुचित जाती महिला, प्रभाग ७ ( साठेनगर - अजिक्यनगर) :अनुसुचित जाती, प्रभाग ८ (राजहंस चौक-शारदानगर शिक्षक काॅलनी) : ओबीसी पुरूष, प्रभाग ९ ( संभाजीनगर - एकनाथनगर) : सर्वसाधारण, प्रभाग १० (कामगार वसाहत - निकमवस्ती) : सर्वसाधारण, प्रभाग ११ (भिलारवस्ती - ढगाईनगर) : सर्वसाधारण महिला, प्रभाग १२ ( रमामातानगर-अहिल्यानगर) : ओबीसी महिला, प्रभाग १३ ( आदर्शनगर - लोणकरवस्ती) : सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ (गोफणेवस्ती - धनवाननगर) : ओबीसी पुरूष, प्रभाग १५ (निंबाळकरवस्ती-वाघमोडेवस्ती) : सर्वसाधारण महिला, प्रभाग १६ (येळेवस्ती-यादव वस्ती) : ओबीसी महिला, प्रभाग १७ (दत्तनगर- खोमणे आडकेवस्ती) : सर्वसाधारण महिला.

निवडणूक जिंकण्याची त्रिसूत्री ...!

माळेगावात एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सरासरी साडेआकराशे ते साडेतेराशे मतदारांचा मर्यादित प्रभाग झाला आहे. तसेच प्रभाग रचनाही पुर्णतः बदलेली आहे. परिणामी भल्याभल्या नेतेमंडळींसह इच्छुक नगरसेवकांचा कस लागणार आहे. दांडगा जनसंपर्क, अर्थिक ताकद आणि त्यानंतर राजकिय पक्ष ही आगामी नगरपंचायत निवडणूक जिंकण्याची त्रिसूत्री राहणार आहे, असे मत अनेकांनी बोलून दाखविले.

loading image
go to top