esakal | माळेगावचा गतवर्षीचा अंतिम ऊस दर २७५० जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावचा गतवर्षीचा अंतिम ऊस दर २७५० जाहीर

माळेगावचा गतवर्षीचा अंतिम ऊस दर २७५० जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने आज गतवर्षीच्या (सन २०२०-०२१)  ऊस गाळप हंगामापोटी सभासदांच्या ऊसाला प्रतिटन २७५० रुपये अंतिम दर जाहीर केला, तर गेटकेन धारकांना २६०० रुपये देण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले. गतवर्षी कारखान्याने १२ लाख ६८ हजार इतके ऊसाचे गाळप केले होते, तर सुमारे ६ कोटी युनिट वीजेची विक्री केली होती.

त्या पार्श्वभूमिवर सोमवारी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्शी अटोळे आदी संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत सभासद व गेटकेन धारकांना वरील प्रमाणे अंतिम दर जाहीर करण्यात आला. विशेषतः याआगोदर सभासदांना एफआरपी व १०० रुपये खोडकी अनुदानासह २५५९ रुपये प्रतिटन आदा केल्याची नोंद आहे, तर गेटकेन धारकांना २४५९ रुपये एफआरपी दिलेली आहे. जाहीर केल्या प्रमाणे सभासदांची उर्वरित प्रतिटन रक्कम १९१ रुपये, तर गेटकेनची १४१ रुपये हे पैसे उपलब्धतेनुसार आदा करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांचे हे पमेंट आदा करण्यासाठी प्रशासनाला जवळपास २२ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

दरम्यान, माळेगाव कारखान्यासह डिस्टलरी प्रकल्पाचे महत्वकांक्षी विस्तारिकण मागिल दोन वर्षांपुर्वी झाले आहे. या कामासाठी सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत. याशिवाय गेली दोन वर्षे साखरेला पाहिजे तेवढा उठाव नव्हता. त्यात मागिल बॅंक कर्जाची देणी देणेही क्रमप्राप्त होते. या समस्यांचे निराकरण करीत  सभासदांच्या उसाला २७५० रुपये अंतम दर दिला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या दिवाळीला सभासदांना प्रतिटन १९१ रुपये एकरकमी मिळतात की पन्नास रुपये मागे ठेवले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहिर केलेले पैसे एकरकमी मिळावेत आणि सभासदांची दिवाळी संचालक मंडळाने गोड करावी, अशी प्रतिक्रिया तुळशिराम शिंदेसह अनेक सभासदांनी केली आहे.

loading image
go to top