Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

Malegaon Bribery Case Forest Guard Held in ACB Trap: माळेगावात पुणे एसीबीचा सापळा; सहा हजारांची लाच स्वीकारताना वनपाल ताब्यात
Baramati Forest Guard Arrested in Malegaon for Accepting Six Thousand Rupees Bribe in Soil Transport Complaint

Baramati Forest Guard Arrested in Malegaon for Accepting Six Thousand Rupees Bribe in Soil Transport Complaint

esakal

Updated on: 

माळेगाव: शेतातील माती वाहून नेण्याच्या कामात अडथळा न आणता काम सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी सहा हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (ता. २५) माळेगाव येथे रंगेहाथ पकडले. जहीर सिराज शेख (वय ४७, वनपाल, वर्ग-३, करंजे राऊंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बारामती) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com