
बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. 24) सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.