

माळेगाव : छत्रपती सहकारी साखर कारखान्यात पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने जी तडजोडीची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली, ती माळेगाव कारखान्यात घेतील का ? पवार आणि पारंपारिक विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात मनोमिल झाले तर आपल्या उमेदवारीचे काय ? अशा अनेक विवंचनेने आज माळेगावचे दोन्ही बाजूचे इच्छुक नेते मंडळी गांगारून गेल्याचे दिसले. रंजन तावरे यांनी मात्र सध्यातरी तडजोडीवर चर्चा नाही. आमची बांधीलकी शेतकऱ्यांशी आणि ऊस दराशी आहे, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.