

Farmers Demand Rs 3,950 First Sugarcane Payment at Malegaon Sugar Factory
esakal
माळेगाव : सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३९५० ते ४००० रुपयांपर्यंत पहिली उचल दिली जात असताना, रिकव्हरी झोन आणि विक्रमी ऊसदराची परंपरा असलेल्या माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्यानेही यंदा प्रतिटन ३९५० रुपये पहिली उचल जाहीर करावी, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी माळेगाव कारखाना कार्यस्थळावर आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आले होते. या वेळी आंदोलक राजेंद्र ढवाण, राहुल पाटील तावरे, ज्ञानदेव बुरुंगले, विलास सस्ते, दिग्विजय कोकरे, अशोकराव सस्ते, इंद्रसेन आटोळे आदींनी शेतकऱ्यांची भूमिका मांडत पहिली उचल ३९५० रुपये देण्याची मागणी केली.