Malegaon sugar factory : माळेगाव साखर कारखान्याचा निर्णय : सभासदांना ३६५०, गेटकेनधारकांना ३४०० रुपये प्रतिटन अंतिम ऊसदर

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निर्णय; सभासदांना प्रतिटन ३६५० रुपयांचा अंतिम ऊसदर, दिवाळीपूर्वी अतिरिक्त रक्कम खात्यात
Malegaon Sugar Factory fixes final cane rate at ₹3,650

Malegaon Sugar Factory fixes final cane rate at ₹3,650

Sakal

Updated on

माळेगाव : आगामी सन २०२६-२७ ऊस गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या उसासाठी सभासदांना ३६५० रुपये प्रतिटन अंतिम ऊसदर देण्याचा आज निर्णय घेतला. यापैकी ३५०० रुपये यापूर्वीच सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून, उर्वरित १५० रुपये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणार आहेत. तसेच गेटकेनधारकांना ३४०० रुपये प्रतिटन देण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरित शंभर रुपये प्रतिष्ठान गेटकेनधारकांना दिवाळीला देण्याचे सांगण्यात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com