माळेगाव - मेगा प्लॅनद्वारे माळेगाव कारखाना विकासाच्या मार्गावर आणणार आहे. माळेगावचा चेअरमन म्हणून मी खुर्चीत बसल्यानंतर खंबीर निर्णय घेण्यासाठी तप्तर राहणार आहे. निवडून येणार्या संचालक मंडळासह सभासदांनी अशा चेअरमनला काम करण्याची संधी द्यावी..राज्याच्या कानाकोपऱ्यात कोठेही असलो तरीही माळेगावबाबत कामाचा ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माळेगावला धाडसी कामगिरीची छाप असणारा चेअमरन मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारार्थ सभासद व कार्य़कर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. माळेगावचा चेअरमन मी स्वतः (अजित पवार) होणार आहे, अशी घोषणा पुन्हा अजित पवार यांनी केली. त्यांनी सभासदांच्या ऊसाला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले..ते म्हणाले, `माळेगावचा यापुढील काळात कारभार पुर्ण पारदर्शक असणार आहे. ऊस शेतीला खर्चाच्या तुलनेत बाजारभाव देण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहणार आहे. शिवाय जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजाने अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे..तसेच उद्योग व्यवसाय, शिक्षणासाठीही कर्ज पुरवठा करण्यास आम्ही कोठेही कमी पडणार नाही. यापुढील काळात शेतकरी सभासद केंद्र स्थानी ठेवून माळेगावचा सर्वांगिण विकास करणार आहे. गुणवत्तेच्या जोरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाची अधिकाधिक चांगली संधी कारखान्यात दिली जाणार आहे.`.`माळेगावच्या कार्यक्षेत्रात अर्थिक सुबत्ता आणण्यासाठी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा प्राचार व प्रसार मी शासनस्तराव करणार आहे. बारामतीकरांसह सर्वांना माहिती आहे, याआगोदर कृती उत्पन्न बाजार समिती, दूध संघ, जिल्हा बॅंक आदी सहकारी संस्थांचा कारभार माझ्या अधिपत्याखाली चांगला झालेला आहे.त्यामुळे माझ्या कर्तबगारीचा झेंडा माळेगाववर उभारण्यासाठी निळकंठेश्वर पॅनेलचे कपबशी चिन्हावर निवडणूक लढणारे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देणे अपेक्षित आहे. `असे आवाहन पवार यांनी केले. रविवार (ता. २२) रोजी मतदान आहे..मतदानाची वेळ बदलली असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे, असे पवार यांनी अवर्जून सांगितले. यावेळी अॅड. केशवराव जगताप, राजवर्धन शिंदे, विश्वास देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते..हार्वेस्टरला अनुदान देण्याचा प्रयत्न...ऊस तोड कामगारांची यापुढे खूपच टंचाई जाणवणार आहे. ती समस्या वेळीच ओखळणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के ऊस तोड ही हार्वेस्टरच्या माध्यमातून कशी करायची याबाबत विचार सुरू आहे.या प्रक्रियेला अधिक बळकटी देण्यासाठी शासनस्तरावर हार्वेस्टर खरेदीसाठी २५ लाखांपर्यंत अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती खांडज येथील सभेत अजित पवार यांनी स्पष्ट केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.