esakal | माळेगाव साखर कारखान्याच्या मतमोजणीला विलंब कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

रंजन तावरे यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर त्यांना सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासनाकडून दाखवले जात होते.

माळेगाव साखर कारखान्याच्या मतमोजणीला विलंब कारण...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीनंतर आज मतमोजणीला प्रारंभ होणार होता. मात्र कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनी स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्याची मागणी केल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतमोजणीला प्रारंभ झालेला नव्हता .

जयश्री गार्डनच्या आवारामध्ये ही मतमोजणी होणार आहे. जयश्री गार्डनमध्ये चार अनोळखी लोक रात्री मुक्कामाला होते असा आरोप करण्यात येत होता, यासंदर्भात रंजन तावरे यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर त्यांना सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासनाकडून दाखवले जात होते.

त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजता देखील मतमोजणीस प्रारंभ झालेला नव्हता .या संदर्भात तक्रारदाराचे समाधान झाल्यानंतरच मतमोजणी सुरू होईल असे संकेत मिळत आहेत.