malegaon sugar factory director body
sakal
माळेगाव - माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार आज संचालक मंडळाने साखर कामगारांना दिवाळीला १५ टक्के बोनस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. उर्वरित बोनसचा निर्णय आगामी संक्रात सणाला घेतला जाईल. कारखाना प्रशासनाने सध्याला बोनस पोटी चार कोटी रूपयांची तरतूद केली, अशी माहिती उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी दिली.