esakal | माळेगाव देणार शासन निर्णायानुसार शेतकऱ्यांना एफआरपी । FRP
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगाव देणार शासन निर्णायानुसार शेतकऱ्यांना एफआरपी

माळेगाव देणार शासन निर्णायानुसार शेतकऱ्यांना एफआरपी

sakal_logo
By
कल्याण पाचंगणे

माळेगाव : माळेगाव साखर कारखाना आगामी काळात शासन धोरणानुसार एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अधिकाधिक देण्यास  प्रयत्न करेल. येत्या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्धिष्ठ आहे. साखर गोडाऊनसह प्रतिदिनी १० टन सीएनजी गॅस प्रकल्प उभारणे आदी महत्वकांक्षी कामे करीत माळेगाव हा नक्की अग्रगण्य ऊस दराशी स्पर्धा करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी केले.

हेही वाचा: प्रायव्हेट जेटमध्ये असं बसलं पाहिजे, प्रियंकाचा फोटो पाहाच!

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्शीलाल आटोळे, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांच्या अधिपत्याखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. परिणामी शासन निर्णयानुसार शिअर्स किंमत वाढविण्यासह सभेपुढे ठेवलेले ११ विषय सर्वानुमते मंजूर झाले. याप्रसंगी अध्यक्ष तावरे यांनी वरील धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली.

यावेळी सर्वाधिक फायद्याच्या ठरलेल्या विमा रकमेत २ लाखाची मर्यादा ८ लाखांपर्यंत वाढविणे, परदेशी शिक्षण घेऊ इच्छुणाऱ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थिक तरतुद करणे, केंद्र शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक इथेनॉल निर्मिती करणे, गतवर्षीच्या अंतिम बिलातील उर्वरित १९१ रुपये एकरकमी दिवाळीला द्यावेत आदी मागण्यांचा आग्रह झाला.

हेही वाचा: एसटीत विसरलेली बॅग सापडली पीएमपीएमएल बसमध्ये

त्यामध्ये सभासद बाबूराव चव्हाण, सुनिल पवार, अनिल जगताप, विनायक गावडे, डी.डी.जगताप, विजय तावरे, विलास तावरे, शेखर जगताप, इंद्रसेन आटोळे आदींचा समावेश होता. दुसरीकडे, अहवाल सालातील प्रतिटन २७५० अंतिम भाव कमी निघाला, विस्तारिकरणाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराबाबत श्वेत पत्रिका काढावी आदी मुद्दे कळीचे ठरले. याविषयी दशरथ राऊत, विक्रम कोकरे, राजेंद्र देवकाते, अरविंद बनसोडे, विलास सस्ते, सुनिल देवकाते, रोहित जगताप आदींनी आक्रमक भूमिका मांडली.

यावर अध्यक्ष तावरे म्हणाले, माळेगावने दोनशे कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे विस्तारिकरण केले. परंतु त्या कालावाधीमध्ये यंत्रसामुग्रीने पाहिजी तेवढी साथ न दिली नाही. ऊस गाळप व रिकव्हरी घसरली. साखरेचा दर्जाही खालावला. वीज, डिस्टलरी आदी प्रकल्पाचे उत्पन्नही कमी आले. शिल्लक साखरेचा प्रश्नामुळे बॅंकाचा विजाचा भुर्दंड वाढला, तोडणी वाहतूकीच्या कर्जासह विविध देणी द्यावी लागली.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर वरवंटा; अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

अशातच २०१९-२० हंगामात उत्पादन खर्च आणि उत्पनाचा विचार न करता प्रतिटन २७०० रुपये अंतिम दर दिला गेला. त्यामुळेच सन २०२०-२१ चा अंतिम ऊस २७५० इतका निघाला,`` असे त्यांनी सांगितले. प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून विस्तारिकरणाची चौकशी चालू असून याबाबत वस्तूस्थिती पुढे येईल, असे तावरेंनी सांगितले.

तत्पुर्वी शेतकरी एकरी शंभर टन ऊस घेतलेले नंदकुमार काशिनाथ जगताप (पणदरे), मालतीबाई गुरव, प्रविण यशवंत गुरव (नीरावागज), तसेच साखर कामगार बाळासाहेब वदक यांचा मुलगा रविराज हा युपीएसस्सी परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल संबंधितांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष बन्शीलाल आटोळे यांनी मानले.

आभिनंदनाचे ठराव

गतवर्षी कोरोनासह विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या आरोग्य विमा योजनेचा सभासदांना सर्वाधिक फायदा होणे, उसाचे वेळेत गाळप केल्याने गहू व हरभाऱ्याची पिके घेता आली, पवारसाहेबांनी साखर कामगारांचा वेतन वाढीचा प्रश्न निकाली काढला, संचालकांनी शंभर टक्के प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले, कर्जमुक्तीकडे कारखान्याची वाटचाल होणे आदी संचालक मंडळाच्या चांगल्या कामांचे अभिनंदनाचे ठराव अनेक सभासदांनी मांडले.

loading image
go to top