माळशेज घाटात दरड कोसळली 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 August 2019

नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात गुरुवारी पहाटे दरड कोसळली आहे. मात्र या ठिकाणी त्वरित एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. 

ओतूर (पुणे) ः नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात गुरुवारी पहाटे दरड कोसळली आहे. मात्र या ठिकाणी त्वरित एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. 

माळशेज घाटात छत्री पॉइंटजवळ मातीचा ढिगारा व काही दगड पावसामुळे महामार्गावर आल्याने वाहतूक थोडी विस्कळित झाली होती, त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. 

काही वेळातच छत्री पॉइंट या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी टळली. प्रशासनाकडून राडारोडा हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. गेल्या महिन्यात माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malshej ghat landslide