केकचे आमिष देऊन बालकावर लैंगिक शोषण करणाऱ्यास अखेर अटक; तब्बल 7 महिने होता फरार

Man arrested who was absconding for 7 months after harassment child
Man arrested who was absconding for 7 months after harassment child

केसनंद : केकच्या आमिषाने बालकाचे लैंगिक शोषण करून पोलिसांना तब्बल सात महिने गुंगारा देणाऱ्या आरोपीस लोणीकंद गुन्हे शोध पथकाने अखेर पिंपरी सांडस येथे जेरबंद केले.

लोणीकंद पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचे नाव हर्षल उर्फ सोनू हरिश्चंद्र शितोळे (वय 32, रा. नाथ मंदिरशेजारी, न्हावी सांडस, ता. हवेली) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणेफाटा (ता. हवेली) येथे राजमाता नगरमध्ये राहणाऱ्या एका १० वर्षीय मुलाला केक खाण्याचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याची फिर्याद ७ डिसेंबर २०१९ ला लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी शितोळेचा लोणीकंद पोलीस शोध घेत होते, मात्र तब्बल सात महिने तो फरार होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अखेर काल (ता. ८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरोपी पिंपरी सांडस परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पिंपरी सांडस गाव, वाडेबोल्हाई-अष्टापुर रोड तसेच, पेरणे-डोंगरगाव रोडवर वेगवेगळी पथके बनवून सापळा लावला. अखेर पिंपरी सांडस येथे आरोपीस पाठलाग करून पोलीस पथकाने शिताफीने जेरबंद केले. पोलीसी खाक्या  दाखवताच आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. 

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, संतोष मारकड, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com