पुणे : विरोधकाशी बोलला म्हणून लोखंडी सळईने मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

विरोधकाशी बोलल्याच्या रागातून वाकडेवाडी येथील एसटी स्थानकावरील एका चहा विक्रेत्यास चौघांनी लोखंडी सळई व लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली.

पुणे : विरोधकाशी बोलल्याच्या रागातून वाकडेवाडी येथील एसटी स्थानकावरील एका चहा विक्रेत्यास चौघांनी लोखंडी सळई व लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व दहा हजार रुपये असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे दोन वाजता वाकडेवाडी येथील एसटी स्थानकामध्ये झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शंकर भिकाजी खांडेकर (रा.पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह चौघांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर आंधळे (वय 26, रा.खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंधळे यांचे वाकडेवाडी येथील नवीन एसटी स्थानकाजवळ चहा विक्रीचा स्टॉल आहे. फिर्यादी व आरोपी हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

फिर्यादी हे खांडेकर याच्या विरोधकाशी बोलल्याचा राग खांडेकर यास होता. त्यातुनच त्याने गुरूवारी पहाटे फिर्यादी चहा विक्री करीत असताना फिर्यादीस हाताने मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादी त्यांच्या पीएमसी कॉलनीतील घरी गेले. त्यानंतर खांडेकर हा त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्याने फिर्यादीस लाथाबुक्‍क्‍या, लोखंडी सळई व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

या घटनेमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम देवकर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Man Beaten by Four Peoples

Tags
टॉपिकस
Topic Tags: