उरुळी कांचन - विवाहितेसमोर स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न करणाऱ्या विकृत व्यक्तीस लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. समीर शहाजहान मुकेरी (वय ३४, रा. कोरेगावमूळ, ता हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वीस वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.