ZP Election Result : लंगोट घालून साजरा केला सुनेचा विजय; देवराम लांडे यांचा लक्षवेधी जल्लोष

जुन्नर तालुक्यात आदिवासी वादळ म्हणून ओळखले जाणारे देवराम लांडे आपल्या बिनधास्त शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.
Devram Lande

Devram Lande

sakal

Updated on

पिंपळवंडी - राजकारणात विजयाचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील, पण जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी आपल्या सुनेच्या विजयासाठी चक्क कुस्तीचा आखाडाच गाजवला.

बारव तांबे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोनाली (माई) अमोल लांडे यांचा विजय जाहीर होताच त्यांचे सासरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी चक्क लंगोट परिधान करून पारंपरिक कुस्तीच्या वेशात जल्लोष साजरा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com