पुण्यात धक्कादायक प्रकार! प्रमोशनसाठी नवऱ्याने बायकोला बॉससोबत... | Pune Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband Wife

Pune News: पुण्यात धक्कादायक प्रकार! प्रमोशनसाठी नवऱ्याने बायकोला बॉससोबत...

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका नवऱ्याने आपल्या पत्नीला प्रमोशन आणि आर्थिक फायद्यासाठी तिच्या बॉससोबत एक दिवस शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितलं असल्याची माहिती आहे.

नवऱ्याने पत्नीला बॉससोबत शारिरीक संबंध ठेवण्याठी जबरदस्ती केली. पीडितेने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, सदर महिलेचा पती लग्नानंतर चुकीच्या लोकांच्या संगतीत आला आणि तिला अनैतिक आणि बेकायदेशीर व्यवहार करण्यास भाग पाडू लागला असा तिचा आरोप असून न्यायालयाने पीडितेची याचिका दाखल करुन घेतली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, पतीने पैशासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. त्याचबरोबर दीरावरही तिचा आरोप असून त्याने अयोग्यरित्या शारिरीक स्पर्श केला आणि त्यामुळे मानसिक त्रास झाला असल्याचं तिने तक्रारीत सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकारानंतरही महिलेच्या सासरच्यांनी पुन्हा तिचा छळ सुरू केला. याप्रकरणी महिलेच्या पालकांनी इंदौर येथील न्यायालयात जाऊन फिर्याद दाखल केली.

त्यानंतर न्यायालयाने महिला कल्याण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासानंतर महिलेचा पती, मेहुणा, सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.