esakal | मॅट्रीमनी साइटवर शोधलेला जोडीदार निघाला भामटा; महिलेची 9 लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

The Man found on the matrimony site cheated the woman for Rs 9 lakh

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका बड्या कंपनीत टीम लिडर म्हणून कार्यरत आहे. तिने जीवनसाथी डॉट कॉमवर विवाहासाठी नोंदणी केली होती. तिच्या मोबाईलवर आरोपीने समीर जोशी नावाने संपर्क साधला. स्वतः: मलेशियातील एका बड्या कंपनीत कामाला असल्याचे सांगितले.

मॅट्रीमनी साइटवर शोधलेला जोडीदार निघाला भामटा; महिलेची 9 लाखांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : मॅट्रीमनी साइटवर जोडीदार शोधणाऱ्या एका महिलेस 9 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत रोख रक्कम आणि धनादेश घेऊन साथीदाराने पलायन केले. या प्रकरणी एका 34 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार समीर जोशी ऊर्फ जगन्नाथ पाटकुले (रा.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एका बड्या कंपनीत टीम लिडर म्हणून कार्यरत आहे. तिने जीवनसाथी डॉट कॉमवर विवाहासाठी नोंदणी केली होती. तिच्या मोबाईलवर आरोपीने समीर जोशी नावाने संपर्क साधला. स्वतः: मलेशियातील एका बड्या कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. यानंतर भारतात आल्याचे सांगत फिर्यादीची भेट घेतली. फिर्यादीशी सातत्याने भेट घेत तिचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर संगणक व इतर साहित्य घेण्यासाठी फिर्यादीकडून रोख व धनादेश स्वरूपात तब्बल 9 लाखाची रक्कम वेळोवेळी घेतली. त्यांच्या भेटीचा आणि पैशाचा व्यवहार फेब्रुवारी महिन्यापासून चालला होता.

कोण घालणार आवर, समाजमंदिरावर टॉवर! भाड्यापोटी येणारे शुल्क नगरसेविकेच्या पतीच्या खिशात

दरम्यान, तब्बल नऊ लाखाची रक्कम घेतल्यावर आरोपी समीरने फिर्यादीशी संपर्क तोडला. प्रथम त्याने फिर्यादीला व्हॉटस अपवर ब्लॉक केले. यानंतर त्यांचे कॉलही घेणे बंद केले. फिर्यादीला याचा संशय आल्याने त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी केली असता, जगन्नाथ पाटकुले नावाच्या व्यक्तीने समीर जोशी नावाने प्रोफाइल बनवून फिर्यादीला गंडा घातल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास राऊत करत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top