
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या 2025 च्या निवडणुकीसाठी पुण्यातील दौंड तालुक्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज केला आहे. उमेश महादेव म्हेत्रे, वय 35, यांनी दिल्लीतील राज्यसभेच्या दालनात उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरलेल्या उमेश यांनी 21 ऑगस्ट रोजी, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे आपला अर्ज आणि 15,000 रुपयांचे डिपॉझिट जमा केले.