Pune Crime News : पुण्यात पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या! सात महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी; परिसरात एकच खळबळ

 crime news
crime news sakal

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील येरवडा परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या दाम्पत्याच्या लग्नाला अवघे दीड वर्ष झाले होते. तर त्यांना सात महिन्याची मुलगी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोसले असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी रूपाली भोसले हिचा निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती.

 crime news
Sharad Pawar : अजित पवार अन् त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. उपचारासाठी रुपाली भोसले यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

 crime news
US Open 2023 : जोकोविचने जिंकलं 24वं ग्रँडस्लॅम विजेतेपद! यूएस ओपनच्या फायनलमध्ये मेदवेदेवचा केला पराभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com