esakal | घोड नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले
sakal

बोलून बातमी शोधा

man saved who was drowning in river

पुराच्या पाण्यात नेहमी प्रमाणे पोहण्यास जाणारा नामदेव साबळे हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे येथील गोनवडी बंधाऱ्यावर वाहून जात होता.

घोड नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

घोडेगाव (पुणे) : घोडेगाव (ता. आंबेगाव) जवळील गोणवडी बंधाऱ्याजवळ घोडनदीच्या पाण्यात वाहून चाललेल्या एका युवकाचे प्राण निसर्ग हा संस्थेच्या युवकांनी वाचवले. ही घटना शुक्रवारी (ता. 16)  रोजी सकाळी 7 वाजता घडली.  शुक्रवारी परतीच्या पावसामुळे डिंभे धरणातून 5 हजार क्यूसेक पाणी सोडल्यामुळे तसेच गोहे खोरे व परिसरातील संतत धार पावसामुळे घोडनदीला पूर येऊन घोडनदी दुथडी भरून वाहत होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुराच्या पाण्यात नेहमी प्रमाणे पोहण्यास जाणारा नामदेव साबळे हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे येथील गोनवडी बंधाऱ्यावर वाहून जात होता. वाहत आलेल्या युवकाने गोणवडी बंधाऱ्याच्या पिलरला धरून मोठमोठ्याने आवाज देत मदतीची याचना करत होता. मात्र, ही घटना सकाळी ७ वाजता असल्यामुळे त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. त्याच्या ओरडण्याचा आवाज निसर्ग हा संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील युवकांनी ऐकला. तेव्हा निसर्ग साहस संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रातील व्यायामशाळेमध्ये असणारे निसर्ग साहस संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग जुन्नर रेस्क्यू टीम चे प्रमुख धनंजय कोकणे आणि त्यांच्याबरोबर रोहन शिवदास काळे, यशराज काळे, जयदीप मुकुंद काळे व प्रतिक नायकोडी इत्यादी युवकांनी त्याला वाहत्या पाण्यातून रोप च्या साह्याने पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.

आणखी वाचा - नांदेड फाटा येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह