
तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन व्यवस्थापक फरार
नारायणगाव : स्वाती शेवगावकर सह अंजली शेवगावकर या तमाशाचा व्यवस्थापक एस. के.शेख हा तमाशा कलावंत यांच्या पगाराचे पैसे न देता तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन फरार झाला आहे.या मुळे सुमारे चाळीस तमाशा कलावंत,बिगारी व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तमाशा कलावंत यांच्या वतीने नंदिनी विजय शिंदे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव हे तमाशाचे केंद्र आहे. यात्रा जत्रा तमाशा कार्यक्रमाच्या आगाऊ नोंदणी साठी येथील तमाशा पंढरीत स्वाती शेवगावकर सह अंजली शेवगावकर या फडाची राहुटी एक महिन्या पूर्वी उभारली होती.या तमाशात फडमालकीण स्वाती शेवगावकर यांच्यासह सुमारे चाळीस कलावंत व बिगारी आहेत.तमाशा कार्यक्रमाचे पैसे व्यवस्थापक एस. के.शेख हा जमा करत असे.मागील एक महिना तमाशा कलावंत या तमाशात काम करत आहेत.६ मे २०२२ रोजी तमाशा हंगाम संपला .त्या नंतर हिशोब करून तमाशा कलावंत व कामगार यांच्या पगाराचे पैसे न देताच व्यवस्थापक शेख पैसे घेऊन फरार झाला. या मुळे गरीब तमाशा कलावंत व फडमालकीण स्वाती शेवगावकर यांचा मुक्काम सध्या नारायणगाव येथे उभारलेल्या राहुटीत असून मागील तीन दिवसां पासून हे सर्व जण वडापाव खाऊन उदरनिर्वाह करत आहेत.
स्वाती शेवगावकर (फडमालकीण) : व्यवस्थापक एस. के.शेख हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे.पैशासाठी या पूर्वी त्याने मला अनेक वेळा मारहाण केली आहे. त्याला राजकिय वरदहस्त असल्याने मला न्याय मिळत नाही.तो पैसे घेऊन फरार झाल्याने कलावंत, भाड्याने घेतलेल्या गाड्या व इतर साहित्य याचे पैसे कसे दयाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Web Title: Manager Absconding With Money Of Tamasha Program
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..